ताज्याघडामोडी

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे
मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता देण्यासाठी महायुतीच्या पाठीशी राहण्याचे केले आवाहन

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात जनतेची फसवणूक केली. कायम जातीपातीचे राजकारण केले. त्यामुळेच २०१४ मध्ये जनतेने त्यांना सत्तेच्या बाहेर फेकले. त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने अनेक विकासकामे केली. लोकांना विश्वासात घेऊन विविध योजना राबवल्या. या काळातील लोकांना या योजनेचा लाभ दिला. विकास आणि समृद्धीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सोलापुरातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी भंडारकवठे येथील सभेत केले.

महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि आ. सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देत मोदी सरकारच्या योजना लोकांसमोर मांडल्या. तसेच पुढील भविष्यासाठी भाजपला निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार राम सातपुते यांनी नांदणी, टाकळी, बोळकवठा, कुरघोट, हत्तरसंग कुडल, माळकवठे, कारकल या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी भंडारकवठे येथे सभा घेतली.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदार संघातून राम सातपुते यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार केला. यावेळी राम सातपुते म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामे केली आहेत. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येक मतदारसंघाला भरपूर विकासनिधी दिला आहे. दक्षिण तालुक्यात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यात आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले आहेत. या पुढीलकाळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांकरिता आपण कटिबद्ध आहोत.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, डॉ. चनगोंडा हवीनाळे, संदीप टेळे, आप्पासाहेब पाटील, अंबिका पाटील जगन्नाथ गायकवाड, हणमंत कुलकर्णी, हनुमंत पुजारी, यतीन शहा, सोमनिंग कमळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago