ताज्याघडामोडी

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली 

मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५ प्लस चा नारा देत असल्याचे दिसून येत होते.यातूनच भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षाचे नेते यांचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढला असल्याचे दिसून आले होते.मात्र आता राज्यात लोकसभा निवणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच सर्वसामान्य लोकात भाजप बाबत निर्माण झालेली नाराजी दूर करता करता मोठी दमछाक होत आहे असेच म्हटले जातंय.आणि अशातच माढा लोकसभा मतदार संघातुन मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करीत उमेदवारी घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.तर सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा हादरा बसला असून सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे हजारो समर्थक असून अनेक समर्थक हे विविध पक्षात देखील विखुरले आहेत.मात्र आता मोहिते पाटलांनी साद घातल्यानंतर हेच मोहिते पाटील समर्थक केवळ धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयासाठीच नव्हे तर पुन्हा जिल्ह्याची सत्तासूत्रे मोहिते पाटील यांच्या हाती आली पाहिजेत यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात आक्रमकपणे आणि  प्रभावी भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे.आणि यातीलच एक म्हणजे प्रख्यात उद्योजक आणि प्रत्येक निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट गुरु अशी ओळख असलेले पंढपुरचे हिम्मत आसबे हे होय.

नुकतेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी शिवरत्न बंगल्यावर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता.याच वेळी हिम्मत आसबे यांनी पक्ष प्रवेश केला.पंढरपूर तालुक्यात आजही मोहिते पाटील यांच्या प्रति निष्ठा असलेला खूप मोठा गट असुन विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत हा गट अतिशय प्रभावी भूमिका बजावत आला आहे.पंढरपूर शहर आणि २२ गावाचा समावेश सोलापूर लोकसभा मतदार संघात आहे.आणि या शहर तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांचे पाठबळ मिळावे यासाठी या मतदार संघातील कॉग्रेसच्या उमेदवार मोहिते पाटील समर्थकांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसून येत आहे.काल शुक्रवारी प्रणिती शिंदे या एका मेळाव्याच्या निमित्ताने पंढरीत आले असता त्यांनी निवडणूक मॅनेजमेंट गुरु अशी प्रतिमा असलेले हिम्मतनाना आसबे यांच्या निवास स्थानी भेट देत चर्चा केली.आमदार प्रणिती शिंदे यांनी हिम्मत आसबे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थक आणखी उत्साहाने आणि जोमाने प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी मैदानात उतरतील असेच चित्र आहे.

यावेळी  दिलीप कोरके, प्रशांत शिंदे,संदीप पाटील, मुसाभाई इनामदार ,सचिन डोईफोडे, विक्रांत आसबे , अरुण फाळके साहेब , काटे सर, लोखंडे सर , संजय घुले,  अनिल घुले, भारत जगताप,  कुमार कडलासकर, अशोक साखरे, यांचेसह  समतानगर मधील सर्व प्रतिष्टीत नागरिक आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago