Categories: Uncategorized

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक

माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या आदेशाने सदर बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना उबाठा गटाचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे. 

   शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ हे या बैठकीत मार्गदर्शन करणार असून या बैठकीत शिवसेना प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके,उपनेत्या अस्मिता गायकवाड,उपनेते शरद कोळी,जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे,स्वप्नील वाघमारे सहसचिव युवा सेना,युवा सेना जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे,सचिन बागल,महिला आघाडी जिल्हा संघटक ऍड.पूनम अभंगराव,आशा टोणपे,शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शिवाजी जाधव,डॉक्टर्स सेल महिला जिल्हा संघटक राजश्री क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.     

 या बैठकीस उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, सर्व विधानसभा संपर्क प्रमुख,विधानसभा प्रमुख,विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक,उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख, शहर समन्वयक, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुख, बुथ प्रमुख, बीएलए एजंट, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदी पदाधिकारी तसेच युवासेना,संलग्न संघटनेचे पदाधिकारी,महिला आघाडीच्या    वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार असून त्यामुळे आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे.      

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago