ताज्याघडामोडी

‘न्यु सातारा पॉलीटेक्निक’च्या विद्यार्थ्यांचे ‘आंतरपदविका स्टेट लेवल ॲथलेटिक्स’ स्पर्धेत उत्तुंग यश

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई यांच्या वतीने  IEDSSA अंतर्गत  दि. १७/०३/ २०२४ रविवार रोजी,पुणे येथे घेण्यात आलेल्या आंतर पदविका स्टेट लेवल ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलीटेक्निक, कोर्टी च्या कु. पल्लवी काळेल  या विद्यार्थिनीने थाळी फेक या स्पर्धेमध्ये  अंतिम सामन्यात प्रथम पारितोषिक पटकाविले, तर कु. मयुरी चव्हाण या विद्यार्थिनीने गोळा फेक या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात द्वितीय पारितोषिक पटकाविले.

गत वर्षांमध्ये न्यु सातारा पॉलीटेक्निक कोर्टी च्या कु.गौरी धनवडे या विद्यार्थिनीने IEDSSA अंतर्गत घेण्यात आलेल्या गोळा फेक या अंतिम स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकाविले होते याही वर्षी विद्यार्थिनींनी थाळी फेक मध्ये प्रथम व गोळा फेक मध्ये द्वितीय पारितोषिक पटकावून महाविद्यालयाची परंपरा कायम राखली आहे व सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.  

विद्यार्थिनींना त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा शिक्षक प्रा. विश्वनाथ कुंभार व श्री. गणेश पडवळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम यांच्याकडून कौतुक करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या. संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे,  प्रा. विशाल बाड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडूनही खेळाडूंचे अभिनंदन यावेळी करण्यात आले .

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago