आज सोलापुरात पत्रकार परिषद घेत भूमिका करणार स्पष्ट
जे महविकास आघाडीत तेच महायुतीत वाट्याला,व्यक्त केली होती खंत
एकीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मोठे इन्कमिंग सुरु असतानाच जिल्ह्यात विशेषतः माढा लोकसभा मतदार संघात आज शिवसेनेस मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख राहिलेले संजय कोकाटे हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून आज ते सोलापुरात पत्रकार परिषद घेत या बाबत घोषणा करणार असल्याचीही चर्चा आहे.संजय कोकाटे यांनी यापूर्वी शिवसेनेकडून २०१९ मध्ये माढा विधानसभेची निवडणूक लढविली असून यात त्यांनी ५ वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे बबनराव शिंदे यांच्या विरोधात ७३ हजार इतकी मते घेतली होती.माढा तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे.संजय कोकाटे यांनी महाविकास आघाडीची सत्ता असतानाही सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी शिवसैनिकांना विचारत घेत नाहीत,कामांबाबत अन्याय होत आहे असा आरोप केला होता तर थेट उध्द्व ठाकरे यांना पत्र लिहुन नाराजीही व्यक्त केली होती.
तर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत देखील हीच परिस्थिती असून खासदार निंबाळकर अथवा भाजपचे पालकमंत्री आम्हाला कुठेही विचारात घेत नाहीत असा आरोपही मध्यंतरी संजय कोकाटे यांनी केला होता.नुकतेच त्यांनी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार गटासह विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट दिल्याचे दिसून आले.तर या कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी जेष्ठ नेते माजी खासदार विजयसिह मोहिते पाटील यांनीही या अभिषेक सोहळ्यास भेट दिली होती.हा धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर संजय कोकाटे हे मोठी भूमिका घेतील,मागील काही दिवसापासून त्यांची महायुतीत सुरु असलेल्या घडामोडी बाबतच्या नाराजीस मोकळी वाट करून देतील असा अंदाज व्यक्त होत होता.
आज संजय कोकाटे हे पत्रकार परिषदेत काय भूमिका घेणार याकडे आता जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांचे आणि शिंदे गटातील अस्वस्थ शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.एकीकडे माढा लोकसभा मतदार संघातून पुन्हा रणजितसिह निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील सर्मथक अस्वस्थ असताना आता संजय कोकाटे देखील मोठा निर्णय घेतील अशीच शक्यता वर्तविली जात आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून मोठा विरोध होत असताना दिसून आला.मागील निवडणुकीत या तालुक्याने खासदार निंबाळकर याना लाखाचे लीड दिले होते आणि यात मोहिते पाटील यांचा मोठा वाटा होता.यातूनच यावेळी मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी जोरदार पाठपुरावा सुरु केला होता.यातूनच खासदार निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्या समर्थकांत सोशल मीडियावर मोठे घमासान होताना दिसून येत होती.तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये सामील झाल्याने खासदार निंबाळकर यांचे बळ वाढले होते.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मागील काही वर्षात अकलूजच्या राजकारणास शह देण्यात मोठी भूमिका बजावली आहे अशीच चर्चा होत आली आहे.त्यामुळे दोन आमदार बंधूचे महायुतीत येणे खासदार निंबाळकर यांच्या फायद्याचे ठरले आहे.शिवसेनेचे जिल्हा संर्पक प्रमुख शिवाजी सावंत,माढा लोकसभा संपर्क प्रमुख राहिलेले संजय कोकाटे यांनी माढा विधानसभा मतदार संघात मागील अनेक वर्षांपासून आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात निवडणुका लढल्या आहेत.मात्र आता आमदार बबनदादा शिंदे महायुतीत आल्याने खरे तर शिवसेनेच्या माढा तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांमध्ये अस्वथता असल्याचे बोलले जात आहे.यातूनच आज संजय कोकाटे वेगळा निर्णय जाहीर करतील अशी चर्चा आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…