ताज्याघडामोडी

५ पानी पत्र लिहून पती-पत्नीने आयुष्य संपवलं, दृश्य पाहून साऱ्यांना धक्का, हादरवणारं कारण समोर

मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. येथे वन विभागाच्या बडतर्फ कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासून पाहत आहेत.

सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वनविभागाच्या वसाहतीत राहणाऱ्या पती-पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. वनविभागात रोजंदारीवर कार्यरत असलेले शिवराज सिंह (वय वर्ष ५७), पत्नी निर्मला (वय वर्ष ५५) हे शुक्रवारी सिधी गावातून परतल्यानंतर सिंगरौली बैधान येथे आले होते. गावावरून परतल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही घरातील खोलीत एकाच फासाच्या साह्याने गळफास लावून घेतला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता आतील दृश्य पाहून सारे हादरले. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली. पोलिसांनी ती सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.

आत्महत्येपूर्वी शिवराज यांनी पाच पानी सुसाईड नोट लिहिली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात वनविभागात काम करणारी त्यांची सहकारी रजनी गुप्ता त्यांना त्रास देत असून पैशांची मागणी करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सहकारी रजनी गुप्ता त्यांना दुसऱ्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला पत्नीसह आत्महत्या करावी लागत आहे. सध्या पोलिस ही सुसाईड नोट ताब्यात घेऊन तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन. कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २६ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२५”

विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी)…

4 days ago

प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त

पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत…

2 weeks ago

प्रा. मोहसीन शेख यांना इनोव्हेटिव टीपीओ पुरस्कार

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख…

4 weeks ago

मैफिल सप्तसुरांची” कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

गुढीपाडवा व नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आयोजित केलेल्या सुशील कुलकर्णी व सहकारी प्रस्तुत…

4 weeks ago

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेत “स्वराज खंडागळे, भारतात पहिला

प्रथम क्रमांकाने भारतात उत्तीर्ण झाल्याबद्दल पंढरपूर सह जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर येथील…

4 weeks ago