मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (१८) हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. त्यांच्यातील वाद मिटल्यानंतर देखील दिक्षांत हा सोहमला नेहमी खून्नस देऊन पाहत होता.
शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता सोहम हा त्याच्या मित्रांसोबत मेहरूण येथील श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता. यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. त्यातील एका दुचाकीवर दिक्षांत सपकाळे, गोपाल चौधरी तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम होते. चौघांनी सोहमला शिवीगाळ केली. याचा जाब विचारताच दिक्षांतने पुन्हा शिवीगाळ करत तु माझ्या बहिणीचा नाद सोडला नाही, थांब तुझा मुडदा पाडतो असे म्हणत सोहमवर गोळीबार केला. त्यानंतर चौघे दुचाकीवरून पसार झाले. या गोळीबारमध्ये कुणाला काहीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. हल्लखोर पसार झाल्याने दोन पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केली होती. हल्लेखार संशयित दिक्षांत उर्फ दादू सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपूर येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता संशयित दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (२०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) आणि गोपाल सिताराम चौधरी (२१, रा. रामेश्र्वर कॉलनी) या दोघांना अटक केली.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…