ताज्याघडामोडी

सारखपुडा झाला पण होणारी बायको नीट बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्.. केलं धक्कादायक कृत्य

लग्न ठरल्यानंतरचा किंवा साखरपुड्यानंतरचा काळ हा जोडप्यांसाठी अतिशय खास असतो. या काळात ते एकमेकांसोबत बोलू लागतात, एकमेकांना समजून घेऊ लागतात. मात्र, कधीकधी हाच काळ अतिशय वाईटही ठरू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. साखरपुड्यानंतर होणारी बायको त्याच्याशी नीट बोलत नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. यामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आनंद जिल्ह्यातील नापाड गावातील 23 वर्षीय समीर राठोड वडोदरातील कोयाली गावात आपल्या मामासोबत राहत होता. त्यांच्यासोबतच गेट सुपरवायझर म्हणून काम करत होता. गुरुवारी तो अचानक बेपत्ता झाला. यानंतर शुक्रवारी नंदेसरी जीआयडीसीजवळ एक मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतदेह समीरचा असल्याचं समजलं. मृतदेहाजवळ रिव्हॉल्व्हर सापडलं. पोलिसांच्या तपासात हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांची चौकशी केली. समीरचा मोबाईलही तपासला. यावेळी आत्महत्येची पुष्टी झाली.

या प्रकरणी एसीपी आर. डी. कवणे यांनी सांगितलं की, समीरची 5 दिवसांपूर्वी एंगेजमेंट झाली होती. पण, त्याची होणारी पत्नी त्याच्याशी बोलत नव्हती. हा प्रकार तरुणाने त्याच्या मित्राला चॅटमध्ये सांगितला होता. याच कारणावरून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वडोदराच्या जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago