ताज्याघडामोडी

अडीच वर्षांच्या मुलाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकला; आई आणि प्रियकराला फाशीची शिक्षा

आई आणि मुलांचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं. आपल्या मुलांना कुठलाही त्रास होऊ नये अशीच प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांवर एखादं संकट आलं तर आई त्यांना वाचवण्यासाठी ढाल बनून उभी राहाते; मात्र काही वेळा आई आणि मुलांच्या नात्यांचे वेगळेच पैलू अचानक समोर येतात. हे पैलू कुणालाही आश्चर्य वाटेल असेच असतात. असाच एक पैलू पश्चिम बंगालमधील एका घटनेतून समोर आला. आपल्या अडीच वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने जीव घेणाऱ्या एका आईला आणि तिच्या प्रियकराला हावडा जिल्ह्यातील फास्टट्रॅक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 1990 नंतर जिल्हा न्यायालयाने प्रथमच फाशी सुनावली असल्याचं सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या फास्टट्रॅक कोर्टाने गुरुवारी (29 फेब्रुवारी) एका आईला आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा सुनावली. या महिलेने 2015 मध्ये तिच्या प्रियकराला हाताशी धरून अडीच वर्षांच्या मुलाचा जीव घेतला होता. या मुलाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत एका सूटकेसमध्ये आढळून आला होता. मृतदेह असलेली ही सूटकेस फलकनामा एक्सप्रेसमध्ये बेवारस अवस्थेत रेल्वे पोलिसांना सापडली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2015 मध्ये या मुलाची आई आणि तिच्या प्रियकराकडून हत्या करण्यात आली होती.

बेवारस सूटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास केला. त्यानंतर आई हसीना सुल्ताना आणि तिचा प्रियकर भानू शाह यांना आंध्र प्रदेशातून अटक केली. गुंटूर हे हसीनाचं सासर. पतीला सोडून आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन ती प्रियकराबरोबर पळून गेली होती. त्यानंतर भानू शहा आणि मुलाबरोबर हैदराबादमधल्या बंजारा हिल्स परिसरात राहात होती. त्यांच्या नात्यात हसीनाच्या मुलाचा अडथळा नको म्हणून दोघांनी मिळून त्याची हत्या केली. मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून सिकंदराबाद स्टेशनवर आणला. ही सूटकेस त्यांनी फलकनामा एक्सप्रेसमध्ये ठेवली होती.

दरम्यानच्या काळात आपली मुलगी आणि नातू यांचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्या दोघांचे फोटो घेऊन हसीना हिच्या आईने पोलिसांत ती दोघं हरवल्याची तक्रार नोंदवली. लहान मुलाचा मृतदेह सापडल्यावर त्या फोटोवरून ओळख पटवून पोलिसांनी तपास सुरू केला. संपूर्ण खात्री पटल्यानंतर त्यांनी हसीना आणि भानू शाह यांना अटक केली. सरकारी वकील अरिंदम मुखोपाध्याय म्हणाले, की सर्व पुराव्यांनिशी हसीना आणि भानू दोषी आढळल्यानंतर जिल्हा फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच वेळी आरोपींचे वकील फिरोज सरकार यांनी मात्र आपण हायकोर्टात न्याय मागणार असल्याचं म्हटलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago