गोपाळपूरच्या ग्रामसचिवालय इमारतीचे शनिवारी भूमिपूजन
पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर याठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम शनिवार दि 2 मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायतचे वतीने देण्यात आली आहे.
पंढरपूर येथे होत असलेल्या यात्रा आणि त्याचा गोपाळपूर याठिकाणी होत असलेला मोठा प्रभाव. यामुळे याठिकाणी मोठी इमारत असणे आवश्यक होते. याबाबत मोहोळ विधासभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि आ. भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. या इमारतीचे भूमिपूजन उद्योजक राजू खरे आणि आ. प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. समाधान आवताडे आणि विठ्ठल सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जि. प चे अतिरिक्त सी ई ओ संदीप कोहिनकर, सांबा. विभागाचे कार्यकारी अभियंता निमकर, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वरीचे संस्थापक सचिव डॉ. बी पी रोंगे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपटे, बाजार समितीचे उप सभापती राजूबापू गावडे, जिल्हा परिषद अधिकारी इशाधीन शेळकांदे, श्रीमती स्मिता पाटील, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव, युवा नेते प्रणव परिचारक, गोपाळपूर तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी आसबे, उप अभियंता लवटे, मिटकरी, पवार, दौंडचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, शाखा अभियंता लोटके, आदीसह अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वरील कार्यक्रमासाठी शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच विलास मस्के आणि ग्रामसेविका श्रीमती ज्योती पाटील यांनी केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…