गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबादमध्ये एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बायकोने आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबियावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि अंजली असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे. अभिषेक हा २५ वर्षांचा होता. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर नवऱ्याचा मृत्यूचा धक्का सहन झाल्याने तिनेदेखील सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे.
अभिषेक आणि अंजलीचे लग्न ३० नोव्हेंबरला झाले होते. हे दोघेही सोमवारी दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात फिरायला गेले होते. तेथेच अभिषेकच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे अंजनीने मित्रांना बोलवून त्याला रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान अभिषेकचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिषेकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याचे सांगितले.
नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का अंजलीला सहन झाला नाही. त्यामुळे अंजलीनेदेखील टोकाचे पाऊल उचलले. अंजलीने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारली आहे. यात अंजली गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने तिचादेखील मृत्यू झाला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…