ताज्याघडामोडी

आवताडे शुगरने ३१ जानेवारी पर्यंतचे सर्व ऊस बिल केले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- संजय आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील  ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता २७११ रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत. तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन  संजय आवताडे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आवताडे शुगर चा हा दुसरा हंगाम सुरू असून पहिला हंगाम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच दुसऱ्या हंगामामध्येही शेतकऱ्यांनी आवताडे शुगर वर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवठा केलेला आहे शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नसून शेतकरी हितासाठीच हा कारखाना आम्ही सुरू केला आहे. चालू हंगामात आवताडे शुगरने ३ लाख ९२ हजार ४६० मे टन उसाचे गाळप आज अखेर केले असल्याचेही सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मा. मोहन पिसे उपस्थीत होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago