ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये “ऋतुरंग २०२४” मोठ्या उत्साहात संपन्न

तरुणाईच्या जल्लोष्याला उधाण, प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी फोडले हास्याचे फटाके

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी महाविद्यालयामध्ये दि. १२ ते १८ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसमेलन “ऋतुरंग २०२४” व क्रीडा स्पर्धा “रन २०२४” हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयांने क्रीडा स्पर्धा व वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “रन २०२४” क्रीडा अंतर्गत क्रिकेट, बॅडमिंटन, चेस, कॅरम, हॉलिबॉल, रनिंग, कबड्डी, अॅथल्याटिक्स अश्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकाला परितोषिक प्रदान करण्यात आले. “ऋतुरंग २०२४” या संस्कृतिक कार्यक्रमामधुन विद्यार्थ्यानी विविध कला सादर केल्या. तसेच फन फेयर, मिस मॅच डे, बॉलीवुड डे, दांडिया अश्या अनेक सादरीकरणातून तरुणाईच्या जल्लोष्याला उधाण आले होते.

दिनांक १६ फेब्रुवारी रोजी हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा “हसवणूक” हा बहारदार कार्यक्रम झाला. याद्वारे त्यांनी हास्याचे फटाके फोडून उपस्थितांना खिळवून ठेवले. यावेळी विद्यापीठाच्या परीक्षेमद्धे प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रा. अजितकुमार कोष्टी यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये व इतर विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.सचिन लादे सरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. प्रा.डॉ.सचिन लादे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठीचा कानमंत्र दिला. सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधांनामत्क विचारसरणी, कठोर परिश्रम हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे असेही त्यांनी नमूद केले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री दिलीप शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रा. अनिल बाबर तसेच ऋतुरंग या वार्षिक स्नेहसम्मेलनासाठी प्रा. राहुल पांचाळ यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago