नागपूरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेजाऱ्यांकडून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. महेश बावणे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच पतीची शेजारच्या बाप लेकांकडून हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जाटतरोडी भागात घडली. महेश बावणे असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेदिवशी बावणे यांच्या पत्नीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता.
यावेळी घरी मेहंदी काढायला आलेल्या मुलीच्या आईने आरोपींकडून उधार घेतलेले पैसे परत का करत नाही म्हणून वाद झाला. यावेळी महेश बावणे यांचा आरोपी शेरू राठोड आणि रितीक राठोड यांच्यासोबत बाचाबाची झाली. मृतक महेशने आरोपी शेरू राठोड आणि रितीक राठोड यांना समज देण्याचा प्रयत्न केला असतानाच त्याची चाकू ने भोसकून हत्या केली.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मारेकरी शेरु राठोडला अटक करण्यात आली असून सहआरोपी मुलगा रितीक राठोड हा फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळाच्या जन्माअगोदरच वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…