सध्याच्या युगाला कलियुग म्हणतात. कारण यात कोणाचा काही भरवसा देता येत नाही. कोण कधी कोणाच्या जिवावर उठेल आणि कधी कोणाचा घात करील, याबद्दल काहीच सांगता येत नाही. याचा प्रत्यय येणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं वाचायला मिळत असतं. अशीच एक घटना हरियाणात घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात टाकून ती फरार झाली.
हरियाणा राज्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. रुबी असं आरोपी महिलेचं नाव असून, तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून वंश आणि यश या आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. वंश 10 वर्षांचा होता, तर यशचं वय सात वर्षं होतं. या दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह बागपतमधल्या उसाच्या शेतात टाकून महिला फरार झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट-मॉर्टेमला पाठवले आहेत.
ही महिला सोनिपतची रहिवासी आहे. तिचा पतीशी घटस्फोट झाला होता. ती आपल्या दोन मुलांसह राहत होती. मुलांना आपल्या मार्गातून बाजूला करून तिला आपल्या प्रियकराशी लग्न करायचं होतं. म्हणून तिने प्रियकरासोबत मिळून आपल्या मुलांची हत्या केली. आपल्या पतीला या प्रकरणात अडकवण्याचा तिचा इरादा होता. म्हणून मुलं गायब झाल्यावर तिने आपल्या पतीवर मुलांच्या हत्येचा आरोप केला होता.
पोलिसांनी माहिती दिली, की त्या महिलेने आपल्या पतीवर मुलांच्या हत्येचा आरोप केला होता आणि एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्यात धक्कादायक बाब उघड झाली. मुलांची हत्या जन्मदात्या आईनेच केल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी आता आरोपी रुबी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…