सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमधील अलठण परिसरात दोन चुलत भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोघांच्या गर्लफ्रेंड असलेल्या चुलत बहिणींनी आपले जीवन संपवले होते.सोमवारी सकाळी अलठण परिसरात त्यांनी एका झाडाला लटकून गळफास घेतला आहे. नरेंद्र वर्मा (वय १९) आणि पुष्पेंद्र वर्मा (वय १८)अशी मृत भावांची नावे आहेत. ज्या झाडाला त्यांच्या गर्लफ्रेंडने गळफास घेतला होता. त्याच ठिकाणी त्यांनीदेखील आपले आयुष्य संपवले आहे.
हे दोघे भाऊ सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केल्याने ते दोघेही तणावात होते. कुटुंबियांच्या सांगण्यामुळे त्यांनी या मुलींशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळेच निलम शर्मा आणि तिची चुलत बहिण रोशनी शर्मा यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतरच या दोन भावांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निलम आणि रोशनीला नरेंद्र आणि पुष्पेंद्रशी लग्न करायचे होते. परंतु कुटुंबियाच्या नकारामुळे नरेंद्रेने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आणि त्याला एक मुलगादेखील होता. त्यामुळेच त्याने निलमशी लग्न केले नाही. तर पुष्पेंद्रनेदेखील रोशनीशी लग्न करण्यास नकार दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी निलम आणि रोशनी लग्न करण्यासाठी घरातून पळून आल्या होत्या. याची माहिती नरेंद्रने मुलींच्या भावालादेखील अलठणला बोलावले. परंतु कुटुंबीय पोहचण्याआधीच या दोघींनी आत्महत्या केली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…