पती-पत्नीतील किरकोळ वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला उंदीर मारायचे विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी साक्षी हनुमंत गिरी (२२) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पती हनुमंत अंकुश गिरी, सासू सरस्वती अंकुश गिरी, अंकुश रामभाऊ गिरी (सासरे), आदित्य अंकूश गिरी (दीर), सुजाता प्रल्हाद भारती (नणंद), शिवाजी भारती (नवऱ्याचा सख्खा मामा), सर्व रा. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा सप्टेंबर २०१८ मध्ये आरोपी हनुमंत गिरी याच्यासोबत विवाह झाला आहे. ते केसनंद येथील लाडबा वस्तीत राहायला होते. तर, सासरचे मंडळी बीड आणि पुणे असे येऊन जाऊन राहत होते.
दरम्यान, कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोपीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी तक्रारदार महिलेचा छळ केला. तसेच, वेळोवेळी मारहाण केली. एकेदिवशी तक्रारदार महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीने तक्रारदार महिलेसोबत वाद घातला. आरोपी पतीच्या कुटुंबियांनी महिलेचे हातपाय पकडले आणि पतीने उंदीर मारायचे औषध पाण्यात घालून जबरदस्तीने तक्रारदाराला पाजले. जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…