लातूरमधून एक अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आपल्याच आईचा जीव घेतला. आई मुलाच्या खोलीत त्याच्यासाठी जेवणातं ताट घेऊन गेली होती. तेव्हाच मनोवस्था ठीक नसलेल्या या व्यक्तीने आईच्या डोक्यात काठीने वार केला. हा वार इतका जबर होता की महिला जमिनीवर कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या 45 वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही घटना लातुरमधील वाल्मीकनगर येथे घडली. पोलिसांनी सांगितलं की, इथे सुभाषचंद्र कंदले (वय 85) हे आपली 79 वर्षीय पत्नी प्रभावती कंदले आणि मानसिक रुग्ण असलेला 45 वर्षीय मुलगा पूनमचंद्र कंदले यांच्यासोबत राहतात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रभावती कंदले या आपल्या मुलासाठी जेवणाचं ताट घेऊन त्याच्या खोलीत गेल्या होत्या. याचवेळी मुलाने आईच्या डोक्यावर काठीने वार केला.
यात महिला गंभीर जखमी झाली आणि जागेवरच कोसळली. यातच महिलेचा मृत्यू झाला. आरोपी मुलाचे वडील बाहेर अंथरुणावर पडून होते. पत्नी बराच वेळ मुलाच्या खोलीतून बाहेर न आल्याने आणि मुलाचाही आवाज येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांना आवाज दिला असता आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर घाबरून त्यांनी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला फोन करून याबाबतची माहिती दिली.
दुसरा मुलगा जयकुमार कंदले हा तातडीने घरी पोहोचला. त्याने दरवाजा वाजवत आईला आणि भावाला आवाज देण्यास सुरूवात केली. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आरोपी मुलाने खोलीच्या दरवाजाची कडी आतून लावली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत खोलीचा दरवाजात उघडला, तेव्हा महिलेचा मृतदेह पाहून सगळे हादरले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. बुधवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…