ताज्याघडामोडी

पत्नीला गॅसवर ठेवलं अन्.. पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा

पती पत्नीतील वाद आपल्याला नवीन नाही. कुठल्याही कारणाने दोघांमध्ये मतभेद होत असतात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला जातात. याचा परिणाम म्हणजे भयानक घटना घडतात. अमरावतीमधून अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने कौर्याची परिसीमा गाठत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील कापुसतळणी गावात दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुकेश तिडके असे या आरोपी पतीचे नाव आहे. तू कामाला जात नाहीस, तू बदमाश आहे, तू माझ्याजवळ राहू नको म्हणत पतीने पत्नीला गॅस वर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा पाय जळाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आहे. या घटनेनंतर आरोपी पती मुकेश तिडकेविरुद्ध माहुली जहागिर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

2 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

3 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 week ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago