ताज्याघडामोडी

जेवण करतानाच कुऱ्हाडीने तोडली मान; मित्रानेच मित्राला संपवलं

राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून गुन्हेगारीच्या काही ना काही घटना समोर येत असतात. यात काहीवेळी किरकोळ कारणावरुन जवळच्या व्यक्तीचीच हत्या केल्याच्याही घटना ऐकायला मिळतात. सध्या वाशिममधूनही अशीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच आपल्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे.

नेहमी सोबत राहणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राची मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केली. ही घटना रात्री 9 च्या सुमारास वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. या हत्येच्या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचं नांव संतोष घोरमोडे असून त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये शाब्दिक वाद झाला होता. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतः च्या घरी येऊन जेवण करत होता. याचवेळी आरोपी मित्राने अचानक येऊन त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातले. यामुळे संतोष घोरमोडे रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

संतोष घोरमोडेची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध धनज बुद्रुक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अंकुश वडतकर, पोलीस कर्मचारी शिवाजी ठवकर आणि इतर घेत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago