ताज्याघडामोडी

मृत्यूपूर्वी तडफडताना पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांचं कांड; गळ्यात ठोकला खिळा, घटनेने खळबळ

एखाद्याला तडफडून मरताना बघून त्याचा आसुरी आनंद घेणाऱ्यांविषयी तुम्ही कधी ऐकलंय का? एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने खून केला असेल तर त्यामागे त्यांचा हेतू असतो. त्याचंही समर्थन करता येत नाहीच; पण फक्त आनंद घेण्यासाठी एका निष्पाप अनोळखी ड्रायव्हरचा खून शाळकरी मुलांनी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूरमध्ये घडली आहे. ही तिन्ही मुलं अल्पवयीन असून त्यांनी पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या हत्येची पद्धत पाहिली होती आणि एखाद्याला मरताना तडफडताना पाहण्यासाठी या मुलांनी हे कृत्य केलंय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तीन अल्पवयीन मुलं 8 वी, 9 वी आणि 11 व्या इयत्तेत शिकतात. त्यापैकी एकाने बहिणीच्या पाठवणीच्या बहाण्याने मंगळवारी (13 फेब्रुवारी) रात्री एसयूव्ही कार बुक केली होती. यानंतर तयार झाल्यानंतर तिघे मित्र गाडीत बसून निघून गेले. त्यानंतर वाटेत तिघेही गाडी थांबवून खाली उतरले आणि त्यांनी ड्रायव्हरचा निर्घृण खून केला.

तीन मुलांपैकी एका मुलाने ड्रायव्हरच्या गळ्यात फास घातला होता. त्यानंतर दुसऱ्याने ड्रायव्हरच्या गळ्यात खिळा मारला. यानंतर चालकाचा गळा दोरीने घट्ट बांधून त्याचा मृत्यू होईस्तोवर ते आवळत राहिले. ड्रायव्हर मरत असताना हे तिघेही जोरजोरात हसत होते, असंही त्यांनीच पोलिसांना सांगितलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago