न्यु सातारा समुह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी मधील विद्यार्थ्यांनी आंतर पदविका क्रीडा स्पर्धा 2023-24 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये तब्बल ११ पारितोषिके मिळवित घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये कु. मोनिका लेंडवे (२०० मीटर रनिंग),कु. गौरी धनवडे(गोळा फेक) तर कु. पल्लवी काळेल(थाळी फेक)यांनी यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु.प्रणाली भोसले (उंच उडी) कु.गौरी धनवडे (भाला फेक) दत्तराज लवटे (थाळीफेक) कु.मयुरी चव्हाण (गोळा फेक) प्रतीक सपताळ (४०० मीटर रनिंग) तसेच ४×१०० साखळी स्पर्धेमध्ये कु.प्रणवी भोसले, कु.स्नेहल सुर्वे, कु.मोनिका लेंडवे, कु.स्नेहा पवार ,कु.शुभांगी लोंढे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला .
याच पार्श्वभूमीवर न्यू सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयाकडून त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोबतच त्यांच्यामधील क्रीडा व कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे सांगण्यात आले व स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . त्याचप्रमाणे स्पोर्ट कमिटीचे ही अभिनंदन याप्रसंगी करण्यात आले.
स्पोर्ट कमिटी हेड श्री. विश्वनाथ कुंभार सर आणि त्यांची टीम यांनी विद्यार्थ्यांकडुन नियमित सराव करून घेतला. या संघातील विद्यार्थ्यांना श्री. गणेश पडवळकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांच्याकडुन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कॉलेजचे संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड , सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…