ताज्याघडामोडी

भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या, विनयभंगाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीने विनयभंगाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

भाजप महिला मोर्चाच्या नेत्याच्या मुलीने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी आठवीत शिकत होती. विनयभंगाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनीला त्रास देत होता. त्याने तिच्यावर एकदा बलात्काराचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने पीडितेचा एक अश्लील व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची सारखी धमकी तो पीडितेला देत होता. त्यामुळे पीडिता घाबरली होती. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून तिने जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रामपूरमध्ये आठवडाभरात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस ठाणे आणि अँटी रोमिओ पथकही हे थांबवू शकलेले नाही. आठवडाभरात जिल्ह्यातील ही दुसरी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दुसऱ्या घटनेची बळी ही सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याची मुलगी आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago