ताज्याघडामोडी

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीने आपली आई आणि 12 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली. यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तरुण चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती सध्या परतीच्या मार्गावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोलकरीण घरी पोहोचली असता तिला तरुण चौहान यांचा मृतदेह लटकत असल्याचं दिसलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी तरुण यांच्या आई आणि मुलाचा मृजदेह बेडवर पडलेला होता. मोलकरणीने तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी सूरज राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात एकूण चार सदस्य होते. यामध्ये तरुण चौहान, त्यांची आई, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश होता. “त्यांची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेल्या होत्या. प्राथमिक तपासात दिसत आहे त्यानुसार, तरुण यांनी सर्वात आधी आई आणि मुलाला विष दिलं. यानंतर त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरु आहे,” असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

शेजाऱ्यांनी सांगितलं आहे त्यानुसार, तरुण चौहान यांची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. तसंच डोक्यावर कर्ज असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असाही दावा केला जात आहे. शेजाऱ्याने सांगितलं आहे की “ते नाराज का होते याची कल्पना नाही. तरुण यांनी काही दिवसांपूर्वी पेप्सीची डिलरशिप घेतली होती. यातून त्यांना फार मोठं नुकसान झालं होतं. यानंतर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी घराचा एक भाग विकला होता. आता काय झालं आहे याची कल्पना नाही. पत्नी परत आल्यानंतरच नेमकं काय झालं ते समजू शकेल. तसंच पत्नी स्वत:हून गेली की पतीनेच मुद्दामून पाठवलं हेदेखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही”.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago