पुण्यात सलग चौथ्या दिवशी हत्येचा थरार दिसून आला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोन तरुणांनी एका महिलेची भररस्त्यात दिवसाढवळ्या हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने परिचय असलेल्या एका तरुणावर गोळीबार केला आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ज्या तरुणावर गोळीबार झाला त्याची प्रकृती गंभीर आहे. आज घडलेल्या घटनेत हत्या झालेल्या महिलेचं नाव वर्षा थोरात असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या दोघांना अटक केली आहे. वर्षा या महिलेला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. १० ते १५ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल मृत महिलेनं चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने आणि गौरव यांनी त्या महिलेकडे मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा या महिलेच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने महिला खाली कोसळली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन त्यांनी या दोन जणांना अटक केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…