बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या कारणावरून जगेश्वर शर्मा नावाच्या व्यक्तीची गळा चिरून अत्यंत भीषण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. ही घटना बायसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मीनापूर पंचायतीतल्या फूलबासा गावातली आहे. मृताचं शिर मक्याच्या शेतात पुरलेलं आढळलं, तर त्याचं धड अद्याप सापडलेलंच नाही. त्याच शेतात त्या व्यक्तीच्या चपला आणि टोपी सापडली आहे. श्वानपथकाची मदत घेऊन बायसी एसपीडीओ आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मृताची पत्नी गौमी देवी यांनी सांगितलं, की जगेश्वर शर्मा पूर्वी कालिचकण शर्माचा ट्रॅक्टर चालवायचा. त्याच्या पत्नीशी जगेश्वर यांचे अनैतिक संबंध होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना मुलीचा फोन आला. त्यानंतर ते अचानक घराबाहेर पडून गेले. त्यानंतर ते बेपत्ता झाले. काल माहिती मिळाली, की ती मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी मिळून त्यांची गळा चिरून हत्या केली आहे. त्यांचं शिर मक्याच्या शेतात गाडण्यात आलं आहे.
शेतात जगेश्वर शर्मा यांचं शिर सापडलं आहे. तिथे टोपी आणि चपलाही सापडल्या आहेत. गौमी देवी यांनी सांगितलं, की कालिचरण शर्मा यांनी त्यांना याआधीही मारहाण केली होती आणि हत्येची धमकीही दिली होती. मीनापूर पंचायतीचे प्रमुख प्रतिनिधी सैयद समसुद्दीन यांनी सांगितलं, की याआधीही या व्यक्तींची पंचायत झाली आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बायसी एसडीपीओ आदित्य कुमार यांनी सांगितलं, या घटनेसाठी अनैतिक संबंध कारणीभूत असावेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. तसंच, मृताच्या धडाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी मृताच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे. सध्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मृत व्यक्तीचं धड सापडल्याशिवाय तपासाला दिशा मिळणार नाही, असं चित्र दिसत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…