घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याच्या कारणावरून मुलाने आईचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार खडकी परिसरात घडला. गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी आरोपी मुलाला अवघ्या काही तासांत शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले.
हा प्रकार रविवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आला. त्यानंतर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला श्रीरामपूर तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहे. त्यांना दोन मुलगे असून, एक खडकीत आणि दुसरा देहूरोड येथे राहतो. त्या मुलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. शनिवारी त्या खडकीतील मुलगा ज्ञानेश्वरकडे मुक्कामी होत्या. ज्ञानेश्वर खडकी येथील दारुगोळा कारखान्यात कामाला होता. तो एकटाच तेथे राहतो. त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याच्या घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याचा त्याचा समज होता. त्या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने शनिवारी रात्री आई झोपल्यानंतर चाकूने गळा चिरला. त्यानंतर ज्ञानेश्वर घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मृत महिलेच्या मोबाइलवर नातेवाइक फोन करीत होते. मात्र, समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. ज्ञानेश्वरला फोन केल्यानंतर तोही फोन उचलत नव्हता. त्यामुळे काही नातेवाईकांनी ज्ञानेश्वरच्या देहूरोड येथे राहणाऱ्या भावाला फोन केला. त्यानेही आई आणि ज्ञानेश्वरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क न झाल्याने त्याने खडकीतील घरी येऊन पाहणी केली. त्या वेळी घराबाहेर आईची चप्पल होती. मात्र, घराला बाहेरून कुलूप होते. त्या मुलाने खिडकीचा दरवाजा ढकलून आत पाहिल्यानंतर रक्ताचा सडा दिसून आला. त्या मुलाने लगेच खडकी पोलिसांना माहिती दिली. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
खडकी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घराला बाहेरून कुलूप होते. मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुस्थितीत होते. मुलगा ज्ञानेश्वर तेथे नव्हता. तो कोणाचेच फोन घेत नव्हता. त्याचा फोनही बंद झाला. त्यावरून ज्ञानेश्वरनेच आईचा खून केला असावा, अशी शंका खडकी पोलिसांना आली. त्यांनी तांत्रिक तपास करून ज्ञानेश्वरच्या मोबाइलच्या लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा लावला. त्याला शिर्डी येथील पुणतांबे गावाच्या हद्दीतून ताब्यात घेतले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…