बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावर अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं बारामतीमध्ये वातावरण तापलंय. अजित पवार यांच्या काऱ्हाटी येथील कार्यकर्त्यांनी आपल्या शेती फार्मवर सुनेत्रा पवार यांचा फ्लेक्स लावला होता. या फ्लेक्सवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फलकावर शाई फेकल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला. ऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकानं सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचं आज (11 फेब्रुवारी) सकाळी निदर्शनास आलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात आहे. त्यापैकी एका फ्लेक्सवर काऱ्हाटी गावात शाईफेक करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचं जाहीर केलं. अजित पवार यांनी अद्याप उमेदवाराचं नाव जाहीर केलं नसलं तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा, या आशयाचा फलक त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता. मात्र, या फलकावर अज्ञातांनी शाईफेक केल्याचा प्रकार घडला आहे. शाईफेक करण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचादेखील फोटो आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…