उधार घेतलेले ३ हजार ५०० रूपये परत न केल्याने एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय तरूणाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना शहरातील गुरूनानक नगरातील आमदार संदीप धुर्वे यांच्या घराशेजारी ९ फेब्रुवारीला रा़त्रीच्या सुमारास घडली. सचीन सुखदेव माटे (३५) रा. गुरूनानक नगर, यवतमाळ असे मृत तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूनानक नगरात सचीन माटे हा कुटूंबीयांसह राहत असून मजुरीचे काम करीत होता. तीन महिन्यापूर्वी सचीन याने घरा शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून ३ हजार पाचशे रूपये उसणे घेतले होते. बरेच दिवस होऊनही सचीन पैसे परत करत नव्हता. अशात शुक्रवारी सचीन आणि त्या अल्पवयीन मुलामध्ये आमदार धुर्वे यांच्या घराशेजारी वाद झाला. दरम्यान रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने सचीन याच्यावर दगडाने वार करत त्याची निघृण हत्या केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. या प्रकरणी मृतक सचीन याचे वडील सुखदेव माटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात मारेकरी अल्पवयीन मुलावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धैर्यशील घाडगे, कर्मचारी दिनेश निंबर्ते करत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…