ताज्याघडामोडी

पुण्याहून कराडला जाताना झोप लागली, उतरली मिरजेत; विवाहितेवर सामूहिक बलात्कार, कर्नाटकात विकले

एक झोपेची तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली आहे. पुण्याहून कराडला आई वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या विवाहित तरुणीला रेल्वेत झोप लागली. तिला कराडला उतरायचं होतं, मात्र झोप लागल्यानं मिरजेला पोहोचली. लवकर गाडी नसल्याने ती रेल्वे जंगक्शनवर थांबली. त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरस्तीने झुडपात ओढत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडित तरुणीला रेल्वे ब्रीजजवळील कामगाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून ठेवलं. एका आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. आरोपींनी तिला कर्नाटकात जमखंडी इथे नेलं आणि तिला विकायचा प्लॅन केला. जमखंडी इथे पुन्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार करुन तिला 4 लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ज्या व्यक्तीला आरोपींनी विकलं त्यांनी तरुणीसोबत केलेलहा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर त्याने पुन्हा मिरजेत ख्वाजा बस्तीजवळ तिला सोडून दिले. विवाहित तरुणीने तिथून थेट पुणे गाठलं आणि पोलीस ठाण्यात न्याय मागायला गेली.

पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सात संशयित तरुणांना अटक केली आहे. सरफू फकीर वय वर्ष 20, संतोष बाबू वय वर्ष 26, जुबेद वय वर्ष 24, खालीद कोरबू वय वर्ष वीस, महंमदहुसैन वय वर्ष 31, अबूजर जमादार वय वर्ष 18, महंमद मुल्ला वय वर्ष 20 अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी अटक करुन सातही जणांना न्यायालयात हजर केलं. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago