देशात प्रेमप्रकरणांमधून हत्या झाल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. केवळ आकर्षणापोटी, पैशांसाठी किंवा इतर काही कारणांवरून या हत्या घडतात. झारखंडची राजधानी रांचीमध्येही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. 3 फेब्रुवारीला प्रियकरानं प्रेयसीसोबत निर्घृण कृत्य केलं. त्यानंतर पोलीस चौकशीत सत्य उघड झालं. रांचीमधल्या मांडर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका जंगलात प्रियकरानं प्रेयसीचा खून केला आणि पुरावे नाहीसे करण्यासाठी दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. गेल्या 3 वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते; मात्र प्रेयसीच्या वाढदिवशीच तिची हत्या करणाऱ्या माथेफिरू प्रियकराचं हत्येमागचं कारण ऐकून धक्का बसेल.
मांडर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या मिन्नी कुमारी या तरुणीची 3 फेब्रुवारीला हत्या झाली. जंगलात एका तरुणीचा मृतदेह जळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी आग विझवली व शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना अनेक पुरावे सापडले, त्यात एक जॅकेटही होतं. टेक्निकल टीमची या घटनेचा तपास करताना पोलिसांना खूप मदत मिळाली. त्यामुळेच पोलिसांनी आरोपी अवनीश कुमार याला पकडलं. त्याची चौकशी केली असता, सगळं प्रकरण उघड झालं.
चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की त्या तरुणीशी त्याचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते; पण मिन्नी हिचं लग्न दुसऱ्याशी ठरलं आणि तिने त्या लग्नाला विरोध केला नाही. त्यामुळे त्यानं तिची हत्या करण्याचा कट रचला. लग्न ठरलेल्या जोडीदाराशी वाढदिवस साजरा करून ती परतत होती, तेव्हा तिला फोन करून तिचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली. त्यानंतर तो तिला घेऊन मांडर भागातल्या जंगलात गेला. दोघांनी जंगलात केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. दोघांनी एकमेकांना केक भरवला. त्यानंतर अवनीशनं रबराच्या पाइपच्या साह्याने मिन्नीचा गळा आवळून तिला मारायचा प्रयत्न केला. मिन्नीने विरोधही केला, तेव्हा त्यानं तिला बुक्क्यानं मारलं. त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त आलं. अखेर अवनीशने पाइपच्या साह्याने तिची हत्या केली.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…