ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्यावर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान

भाळवणी: सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतरावदादा काळे यांच्या 22 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी ( 9 फेब्रुवारी) दुपारी 2 नंतर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे. 

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात कल्याणराव काळे यांनी पुढे म्हटले आहे, स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. यंदाचे 18 वे वर्ष असून, आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी वसंत केसरी कुस्ती आखाडा गाजवलेला आहे. यावर्षी 86 किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या ओपन गटामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पैलवानास एक लाख एक हजार रुपये रोख बक्षीस व चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या पैलवानास 51 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 25 हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकास 11 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जाणार असून या कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे होणार आहेत. 

मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन धनाजी मदने करणार असून महाराष्ट्र कर्नाटक हलगी फेम सुनील कागल यांच्या हलगीच्या खणखणाटात कुस्त्या निकाली निघणार आहेत. पंच म्हणून धनराज भुजबळ व संतोष पाटील काम पाहणार असून, कल्याणराव काळे बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्यावतीने आयोजित या भव्य कुस्ती मैदानास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी, हितचिंतक,कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कल्याणराव काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष भारत कोळेकर, कार्यकारी संचालक झुंजार आसबे आणि संचालक मंडळाने केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago