बहिणीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या अंबड परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयितास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरात कामाटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि आनंद आंबेकर हे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघे शाळेतही बरोबर होते तर मोठे झाल्यावर बिगारी कामदेखील सोबत करायचे. काल रात्री दोघेही दारु पिण्यासाठी बसले होते.
यावेळी दारूच्या नशेत आनंद इंगळे याने आनंद आंबेकरच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले. यावरुन दोन्ही मित्रांमध्ये जोरदार वाद होऊन रस्त्यावरच भांडण सुरू झाले. याच भांडणातून आनंद आंबेकर याने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप वाघ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नाहीद शेख सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी आनंद आंबेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…