श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सहकारी शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत फेस्टिवलचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलाबरोबरच शेती, सहकार ,शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रात वसंत दादांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम शैक्षणिक संकुलात राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले . दिनांक o७ फेब्रुवारी रोजी वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदयात्रा व बाजार डे ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सहकार शिरोमणि वसंतदादा काळे यांचा जयंती समारंभ संपन्न होणार असून या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक आबा साळुंखे- पाटील टीव्ही ९ मराठी च्या वृत्तनिवेदिका निकिता पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलामधील सर्व शाखातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. दिनांक ०५फेब्रुवारी पासून मोफत दोन चाकी व चार चाकी गाड्या सर्व्हिसिंग कॅम्प आयोजन वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडीकुरोली येथे करण्यात आले असून त्यामध्ये दोन चाकी व चार चाकी गाड्यांचे सर्विसिंग केले जाणार आहे. जनकल्याण व मुक्ताई नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंत फेस्टिवलच्या माध्यमातून मनोरंजना सोबतच आनंददायी मेजवानी विद्यार्थ्यांना व पालकांना मिळणार आहे तरी यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन बाळासाहेब काळे यांनी केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…