ताज्याघडामोडी

घरातून पळून गेले, विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन

वर्धा जिल्हा चांगलाच हादरला आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं. 

दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला. पण, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ जानेवारीला तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या दिवशीपासून तळेगाव पोलीस या दोघांचाही शोध घेत होते.

पारडी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. याची माहिती पारडीच्या पोलीस पाटलांना मिळाली. त्यांनी लागलीच तळेगाव पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर जाऊन मृतदेह विहिरी बाहेर काढले.

विहिरीतून हे दोन्हीही मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाची चौकशी केली. तेव्हा बेपत्ता असलेल्या मुला-मुलीची ओळख पटली. दोघांनी ओढणीनं पाय बांधून विहिरीत उडी घेतल्याचं निदर्शनास आलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago