ताज्याघडामोडी

इंस्टाग्रामवरील ओळख महागात; विवाहित महिला तरुणाला भेटायला गेली, नंतर असं काही घडलं की आली पश्चातापाची वेळ

सोशल मीडियामुळे दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एका तरुणीची शिक्रापूर येथील तरुणांसोबत ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर या महिलेला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्या तरुणाने या विवाहितेला भेटायला बोलवत लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवरून ओळख करत अहमदनगर शहरात बोलावून घेत एका विवाहितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमीर हसन शेख यास कोतवाली पोलिसांनी शिक्रापूर येथून शुक्रवारी अटक केली. पीडित महिलेशी आरोपीने इंस्टाग्रामवरून ओळख वाढविली. पीडितेला अहमदनगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्यासाठी बोलविले. पीडित बसस्थानक महिलाही मुलासह परिसरात आली.

आपण कुठे तरी निवांत बसून बोलू, असे म्हणत आरोपीने पीडितेला बसविले. तेथून तो पीडित महिलेला दुचाकीवर घेऊन शहरातील एका लॉजवर गेला. लॉजवर पोहोचल्यानंतर मारहाण करत पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने फोनवरून आरोपीला विचारणा केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. फिर्यादीवरुन गु.र.नं. १५८३/२०२३ भादंवि क. ३७६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यास शिक्रापूर येथून अटक केली असून, कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, शीतल मुगडे, तनवीर शेख, ज्ञानेश्वर मोरे, दीपक रोहकले, तान्हाजी पवार आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago