ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध, आईवडिलांनी झोपतच तिला संपवलं; गुन्हा लपवण्यासाठी केला बनाव

हिकायतनगर येथील ऑनर किलिंगच्या प्रकरणात शनिवारी पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना अटक केली. समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीला विळ्याने वार करून हत्या केली होती. ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. अंकिता रामराव पवार, (वय 17 वर्ष) असे मयत मुलीचं नाव आहे.

हिमायत नगर शहरातील अंकीता पवार या 17 वर्षीय मुलीचे परजातीय मुलासोबत प्रेम संबंध होते. महिनाभरापूर्वी त्या मुलासोबत अंकीता पळून गेली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी तिला घरी पाठवले होते. पण त्याच मुलाशी लग्न करण्याचा हट्ट मुलीने धरला. कुटुंबीयांना तिचे प्रेम संबंध मान्य नव्हते. याच कारणानं मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीचा हत्या केली. विळ्याने वार करून अंकीता पवार हिची हत्या करण्यात आली. मुलगी झोपेत असताना आई-वडिलानी विळ्याने वार करून तिची हत्या केली.

हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव आई वडिलांनी केला होता. पण पोलिसांना घटनेबाबत संशय होता. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला. मुलीच्या डोक्यात आणि अंगावर गंभीर जखमा असल्याचा अहवाल वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिला. त्याच कारणाने मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले. वैद्यकिय अहवाल आणि घटना स्थळावरील पुराव्यावरुन खून झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. आज मयत मुलीचे वडील रामराव पवार आणि आई पंचफुला पवार यांना अटक करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago