छत्तीसगड राज्यातल्या अंबिकापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. स्वतःच्या आठ महिन्यांच्या बालकाची हत्या करून एक महिला फरार झाली. तिने चाकूच्या साह्याने आपल्या बालकाची हत्या केली. फरार झाल्यानंतरतिनेआत्महत्या केल्याचं आता उघड झालं आहे. तिचा मृतदेह तलावात तरंगत असल्याचं आढळलं. सकरिया गावातल्या तलावात तिचा मृतदेह आढळला. पोलीस या महिलेचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते.
पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ही महिला नाराज होती. तिने पतीला अशी धमकीही दिली होती, की त्याने मद्यपानाचं व्यसन सोडलं नाही, तर ती मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या करील. तिने ती धमकी खरी करून दाखवली आहे. पोलिसांनी तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करवून घेतलं आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
कुन्नी चौकी पोलीस ठाण्यात 26 जानेवारीला अशी माहिती देण्यात आली, की कोणी तरी आठ महिन्यांच्या निरागस बालकाची हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी तपास सुरू केला. तपासात असं निष्पन्न झालं, की आईनेच आपल्या मुलग्याची चाकूने हत्या केली आहे आणि ती फरार झाली आहे. पोलीस तपासात असं आढळलं, की आरोपी महिलेचा पती पवन चौहान याला मद्याचं व्यसन होतं. दररोज मद्यपान करून तो पत्नीशी भांडायचा. 25 जानेवारीच्या रात्रीही तो मद्यपान करून घरी आला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये मोठं भांडण झालं.
त्या वेळी पत्नीने पतीला धमकी दिली होती, की बाळाची हत्या करून ती स्वतः आत्महत्या करील. नशेत असलेल्या पतीने त्याकडे दुर्लक्ष केलं. पती सकाळी उठला, तेव्हा आठ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह त्याच्यासमोर पडलेला होता आणि पत्नी घरात नव्हती. ती पळून गेली होती. त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला, आरडाओरडा झाला. या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमला पाठवला आणि त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…