ताज्याघडामोडी

आई आणि मोठ्या भावाने मिळून लहान भावाची केली हत्या

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील तुंगी गावात मोठ्या भावानेच सख्या लहान भावाचा स्वतःच्या आईच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश जाधव (वय 23) असं मृत तरुणाचं नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आई आणि मुलावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. २८ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव या तरुणाने औसा पोलीस ठाण्यात भावाने आत्महत्या केल्याची माहिची दिली होती. माझा भाऊ योगेशने शेतातील पत्र्याच्या शेडला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे, असं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांनी योगेशत्या आकस्मात मृत्यूची नोंद केली.

पुढे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. त्यावेळी चौकशी करताना त्यांना संशयास्पद गोष्टी जाणवल्या. त्यावर पोलिसांनी तपासाची सूत्र आणखी फिरवली आणि सत्य समोर आलं. योगेश सतत दारू पिऊन यायचा. घरामध्ये भांडणं करायचा त्यामुळे त्याच्या आईने आणि भावाने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. ही हत्या नसून आत्महत्या आहे हे भासवण्यासाठी या दोघांनी बनाव रचला. आधी त्यांनी शेतात फाशी घेताना वापरली जाणारी दोरी लटकवली आणि योगेशला देथे नेऊन गळफास दिल्यासारखे भासवले. पोलिसांनी आता आई आणि भावला ताब्यात घेतलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago