ताज्याघडामोडी

विवाहित महिला कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडली; नवऱ्याला सोडून पळून गेली, त्यानंतर भयंकर घडलं

विवाहित महिला कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती नवऱ्याला सोडून कॅब ड्रायव्हरसोबत पळून गेली. परंतु त्यानंतर अतिशय भयंकर घडलं आहे. तिच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या प्रियकराचा खून केल्याची माहिती मिळतेय. 

कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. 19 वर्षीय हिना मेहबूब आणि तिचा प्रियकर यासिन आदम (21 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तौफीक शौकत (२४) असं आरोपीचं नाव आहे. तो कोकटनूर गावचा रहिवासी आहे.

हिना आणि तौफिक यांचं चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांनी दर्ग्यात जाण्यासाठी कॅब भाड्याने घेतली होती. मात्र, हिना कॅब ड्रायव्हर यासिनच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती पतीला सोडून कॅब ड्रायव्हर यासिनसोबत पळून गेली. त्यानंतर हिना आणि तिचा प्रियकर यासीन कोकटनूर येथील फार्महाऊसमध्ये राहू लागले.

तौफिकला हिनाच्या या कृत्याचा राग आला. राग अनावर झाल्यामुळे तौफिकने मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झालाय. तौफिकने पत्नी हिनाचा शिरच्छेद केला आणि नंतर यासिनची हत्या केली. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या हिनाच्या आई-वडिलांवरही तौफिकने हल्ला केला. जखमींवर राज्यातील मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago