ताज्याघडामोडी

YouTube वर स्टार होणं जीवावर बेतलं, प्रसिद्ध YouTuber ची 7 जणांनी मिळून केली हत्या

राजधानी दिल्लीच्या जवळ असलेल्या नोएडामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं उघड झालं आहे. प्रसिद्ध युट्यूबर दीपक नागर याची 7 जणांनी हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दनकौर क्षेत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा युट्यूबर दीपक नागर याला त्याच्या मित्रांनी जबर मारहाण करून त्याची हत्या केली आहे. प्राथमिक पातळीवर पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच दोघा जणांना अटक केली आहे; मात्र अद्याप अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

दनकौर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार सिंह यांनी मंगळवारी (30 जानेवारी) सांगितलं की, दीपक नागरचे वडील बलबीर यांनी काल (सोमवारी) रात्री पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, मनीष, प्रिन्स, विकी, विजय, योगेंद्र, कपिल आणि मिंकू यांनी त्यांचा मुलगा दीपक याला 28 जानेवारीला घरातून बोलावून आपल्याबरोबर नेलं होतं. बलबीर यांनी तक्रारीत असंही म्हटलं आहे की, आरोपींनी त्यांच्या मुलाला दारू पाजली. त्याला मारहाण केली. त्या मारहाणीमुळे तो गंभीरपणे जखमी झाला. त्याच गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारांसाठी ग्रेटर नोएडा इथल्या यथार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथेच उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ठाण्याचे प्रभारी म्हणाले, की तक्रारदाराच्या सांगण्यावरून घटनेबाबत तक्रार दाखल करून घेतली असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी मनीष हासुद्धा यू-ट्यूबर आहे, असं सांगितलं जात आहे. त्याच्याकडून दीपकने यू-ट्यूब चॅनेल खरेदी केलं होतं आणि त्यानंतर दोघांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक आपल्या आईसोबत मिळून गेल्या पाच वर्षांपासून यू-ट्यूबवर विनोदी व्हिडिओ तयार करत होता. त्याच्या फॉलोअर्सची संख्यासुद्धा मोठी आहे. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago