16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलीच्या बापाने एका वृद्धाची हत्या केलीय. उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राम आसरे कुशवाह असं मृत व्यक्तीचं नाव असून तो 61 वर्षांचा आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी रामश्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलालपूर पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत राम आसरे कुशावह हे शेतकरी होते. त्यांना आठ मुली असून, त्यांपैकी 6 मुलींची लग्नं झाली आहेत. दोन मुली अद्याप अविवाहित आहेत. मृत व्यक्ती राहत असलेल्या परिसरातली 16 वर्षांची एक मुलगी गरोदर राहिली होती. तिच्या कुटुंबीयांनी संबंधित मुलीचा 1 जानेवारी 2024 रोजी गर्भपात केला होता. तसंच गर्भवती मुलीला तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाच्या वडिलांचं नाव विचारलं असता, तिने राम आसरे यांचं नाव सांगितलं होतं. त्यामुळे रागाच्या भरात मुलीच्या वडिलांनी राम आसरे यांच्या गळ्यावर 22 जानेवारी 2024 रोजी कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्यानं राम यांना तातडीने झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तेथेच उपचार सुरू असताना शुक्रवारी (26 जानेवारी 2024) त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी राम आसरे यांचे जावई ब्रिजेंद्र कुशवाह यांनी सांगितलं, की ‘माझे सासरे शेती करायचे. परिसरातली 16 वर्षांची एक मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुलीच्या पोटात वाढणारं मूल राम आसरे यांचं असल्याचा आरोप केला. हा प्रकार कळल्यावर आम्ही तातडीने सासऱ्यांच्या घरी आलो व त्यांच्याशी बोललो. त्या वेळी संबंधित मुलीच्या पोटातलं मूल माझं नाही, असं माझ्या सासऱ्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यावर आम्ही त्यांना पोलिसात तक्रार देण्यास सांगितलं असता त्यांनी त्यासही नकार दिला. तसंच पंचायत बोलावण्यास नकार दिला. ना माझ्या सासऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, ना मुलीच्या घरच्यांनी तक्रार केली.’
राम आसरे यांचे दुसरे जावई अरविंद यांनी सांगितलं, की ‘अफवा पसरल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी माझ्या सासऱ्यांबद्दल मनात राग धरला. 21 जानेवारीला सकाळी सासरे घराबाहेर उभे होते. त्याच वेळी मुलीचे वडील कुऱ्हाड घेऊन आले व त्यांनी कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला. त्यांना वाचवण्यासाठी माझी सासू रामश्री गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या सासऱ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.’ दरम्यान, या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या हमीरपूर जिल्ह्यात सुरू असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…