ताज्याघडामोडी

वादामुळे पत्नी मुलांसह माहेरी; पती आणि सासू मुलांना भेटायला गेले, मित्रांच्या मदतीने मेव्हणा नको ते करुन बसला अन्…

आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पत्नी आणि पतीचे वाद सुरू आहेत. पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई- वडिलांसोबत राहते. दोन दिवसांपूर्वी पती आपल्या मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासुरवाडीत गेला होता. त्या ठिकाणी आधी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटून दिले नाही. नंतर त्याच्या मेव्हण्याने आपल्या काही मित्रांना बोलून त्या ठिकाणी पतीला बेदम मारहाण केली. मग मध्यस्थी करायला गेलेल्या पतीच्या आईलादेखील महिलांनी आणि पुरुषांनी मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या तीन जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या आजीवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago