ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांनी केली युवासेना शहर प्रमुखाची हत्या

चंद्रपूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येने गुरुवारी चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्याच 3 कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. युवा सेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची गुरुवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवा वझरकर याचा अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर या मित्राच्या कार्यालयाजवळ मृतदेह आढळला. मृतक आणि 3 आरोपी यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक कारणावरून धुसफूस सुरू होती. त्यावरून शिवा याला भेटायला बोलावून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर शिवा समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला. हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या उबाठा गटाच्या 3 कार्यकर्त्याना पोलिसांनी रात्रीच अटक केली.

शिवा वझरकरची हत्या झाल्याचं समजताच त्याच्या समर्थकांनी संशयित आरोपीचे जेसीबी आणि वाहनांची मोडतोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकरचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago