देशातली रस्ते वाहतूक आणि टोल व्यवस्था अधिक सुरळीत व्हावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग प्रणाली सुरू केली आहे. त्यात 31 जानेवारी 2024 पासून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ नावाचा नवीन उपक्रम सुरू होणार आहे.
एनएचएआयच्या माहितीनुसार, सध्या अनेक वाहनमालक एकापेक्षा जास्त वाहनांमध्ये एकच फास्टॅग वापरतात. यामुळे टोलवसुली प्रक्रियेत, टोल भरण्यास विलंब होतो, टोल लेनमधली गर्दी वाढते आणि टोल चुकवण्यासारखी अनियमितता निर्माण होऊ शकते.
‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम या समस्यांवर मात करण्यास मदत करील. प्रत्येक वाहनासाठी एक युनिक फास्टॅग असेल, याची खात्री या उपक्रमाद्वारे केली जाईल. टोलवसुली प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल. ज्या फास्टॅगचं केवायसी पूर्ण झालेलं नाही असे सर्व फास्टॅग ब्लॉक करण्याचं काम या उपक्रमांतर्गत एनएचएआय करणार आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर एखाद्या वाहनाचं फास्टॅग ब्लॉक झालं असेल आणि त्या वाहनाने टोल न देता प्रवास केल्याचं आढळलं तर ते वाहन ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे.
फास्टॅग केवायसी स्टेटस चेक कसं करायचं?
– फास्टॅगच्या https://fastag.ihmcl.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
– रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करा.
– लॉग केल्यानंतर डॅशबोर्ड मेनूवर क्लिक करा.
– डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला असलेला ‘माय प्रोफाइल’ ऑप्शन निवडा.
– ‘माय प्रोफाइल’ पेजवर तुम्हाला तुमचे फास्टॅग डिटेल्स दिसतील.
– जर तुमचं केवायसी पूर्ण झालेलं असेल तर ‘केवायसी स्टेटस’ ‘कम्प्लीट’ दिसेल.
केवायसी अपडेट कसं करावं?
– प्रोफाइल सब-सेक्शनवर क्लिक करा.
– त्यानंतर ‘कस्टमर टाइप’ निवडा.
– तिथे तुमचा आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ अपलोड करा.
– तिथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.
– शेवटी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…