विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) भागात हा प्रकार घडला आहे.
शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवत या शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर याबाबत विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पीडित विद्यार्थिनीने पालकांसोबत तारापूर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.
विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात कलम ३५४ सह पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…