महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इतकंच काय, तर अश्लील भाषा किंवा मीडिया फाइल्स वापरून ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा महिलांचा लैंगिक छळ केला जातो; मात्र लैंगिक अत्याचाराचा सामना फक्त महिला आणि मुलीच करतात असं नाही. अलीकडे मुलंदेखील अशा घटनांना बळी पडतात. पंजाबमध्ये 9 वर्षांच्या एका मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधल्या खन्ना नावाच्या गावात एका व्यक्तीने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलावर बलात्कार केला. आरोपीने नऊ वर्षांच्या मुलाला चॉकलेट आणि चिप्स देण्याचं आमिष दाखवून स्मशानभूमीत नेलं आणि तिथे त्याच्यावर अत्याचार केला.
ही घटना घडली त्यापूर्वी पीडित मुलगा शेतातल्या कूपनलिकेजवळ खेळत होता. तिथेच आरोपीने मुलाला चॉकलेट आणि चिप्स दिले. मुलगा निवांत खेळत असल्याचं बघून त्याची आई तिथून आपल्या कामाला गेली. त्यानंतर आरोपीने मुलाला स्मशानभूमीत नेलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलाने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून मुलाची आई घटनास्थळी पोहोचली. आईला पाहताच आरोपीने तेथून पळ काढला.
आईने मुलाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पीडित मुलावर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आरोपीविरुद्ध गैरवर्तन आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. डीएसपी राजेश शर्मा यांनी सांगितलं, की या प्रकरणातल्या दोषीला कडक शिक्षा दिली जाईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…