माणसाचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं, की तो काहीही करून बसतो, मग तिथे तो नातं-बितं काही पाहत नाही. अशीच एक घटना हरियाणा राज्यात घडली आहे. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर आपल्या दोन मुली आणि छोटा मुलगा यांना घेऊन तो जवान फरार झाला आहे. रोहतकच्या जवळ असलेल्या डोभ नावाच्या गावात ही दुर्दैवी घटना घडली असून, फरार झालेल्या जवानाचा पोलीस शोध घेत आहेत. रोहतक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृत नीलमचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. सध्या अधिक तपास सुरू आहे.
शनिवारी (20 जानेवारी) संध्याकाळी रोहतक पोलिसांना माहिती मिळाली, की भिवानी रोडवरच्या डोभ गावात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी गेले. घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी फॉरेन्सिक युनिटच्या प्रभारी डॉक्टर सरोज दहिया यांच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण केलं. पोलिसांच्या टीमसह फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचं काम केलं. मृतदेह पोस्टमॉर्टेमला पाठवण्यात आला.
तपासात पोलिसांना असं आढळलं, की नीलमच्या डोक्यावर जड हत्याराने वार करण्यात आले आहेत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. नीलमच्या माहेरच्यांनी असा आरोप केला आहे, की नीलमचा पती कश्मिरी लाल आणि त्याची आई म्हणजेच नीलमची सासू या दोघांनी लग्नानंतर लगेचच नीलमला त्रास द्यायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी नीलम आपल्या भावाच्या लग्नाला गेली होती आणि आठवड्याभरापूर्वीच ती तिथून परतली होती. त्यावरूनही तिची सासू तिला सातत्याने टोमणे मारत होती.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जवान कश्मिरी लाल शुक्रवारीच (19 जानेवारी) रजा घेऊन घरी आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने पत्नीची हत्या करून दोन मुली आणि एका छोट्या मुलासह पळ काढला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत असून, त्याला अटक झाल्यानंतरच या हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…