सतत होणाऱ्या वादामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडले. तसेच तिच्या आईने देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. या रागातून तरुणीच्या प्रियकराने प्रेयसीच्या आईचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरातील एका उच्चभ्रू सोसायतीत घडली. वर्षा क्षिरसागर (५८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृण्मयी जगदीश क्षीरसागर या तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यावरून शिवांशू दाचाराम गुप्ता (२३, रा. मोहननगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जानेवारीला घडली. मात्र, सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यांनतर खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपीचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात विविध कारणांवरून सातत्याने वाद होत होते. त्यामुळे तक्रारदार तरुणीने यापुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
तरुणीच्या आईने देखील या दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. तसेच प्रेमसंबंध ठेवायचे नाही, असे बजावले होते. त्याचा आरोपीला राग आला होता. घटनेच्या दिवशी तक्रार करून घरी नसताना आरोपी त्यांच्या घरी आला. त्याच घरातील कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने तरुणीच्या आईचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह बेडरुममध्ये ठेवला आणि आरोपी तेथून निघून गेला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…