ताज्याघडामोडी

हॉटेल मॅनेजरने बीचवर केला पत्नीचा खून, पोलिसांना म्हणाला अपघाताने बुडाली पाण्यात

राजबाग-काणकोण बीचवर पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला असून, संशय येऊ नये म्हणून पतीने अपघाताचा बनाव केला.कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी संशयित पतीला अटक केली आहे. गौरव कटियार (29, रा. कोलवा, मूळ लखनऊ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. तर, दीक्षा गंगवार (वय 27, लखनऊ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पत्नी दीक्षासह राजबाग-काणकोण येथील काब-दी-रामजवळ फिरण्यासाठी म्हणून गेले होते. गौरव पत्नीला खडकाळ भागात घेऊन गेला आणि त्यानंतर झालेल्या वादातून पत्नीला समुद्राच्या पाण्यात बुडवले. पण, पत्नी आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेली असता अपघाताने पाण्यात बुडाली, असे संशयित पती गौरवने पोलिसांना सांगितले.

या घटनेसंबधित समोर आलेल्या व्हिडिओत संशयित पती पत्नीचा मृतदेह बाहेर काढताना दिसत आहे. संशयिताने पत्नीचा खरच मृत्यू झाला आहे की नाही हे देखील पाण्यात जाऊन तपासले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी संशयित गौरवची चौकशी केली असता त्याची उत्तरे संशयास्पद आढळून आली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर संशयित गौरवने पत्नीच्या खूनाची कबुली दिली आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago